संगीत प्रेमींसाठी ‘सुमधुर गीतांचा 30 ऑक्टोबरला कार्यक्रम
![]()
अमळनेर दि २८- येथे 30 ऑक्टोबर ला संध्याकाळी ७ वाजता शहरातील जुना टाऊन हॉल येथे संगीत प्रेमींसाठी हिंदी-मराठी फिल्मी सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दीपावली निमित्ताने रसिकांसाठी गाण्यांच्या फराळाची खास संगीत मेजवानी राहणार आहे.प्रवेश विनामूल्य आहे.
*स्वरांजली म्युझिकल गृप, अमळनेर तर्फे* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व दर्दी रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम हा लाईव्ह म्युझिक आहे.

