अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. अनिल शिंदे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी
1 min read

अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. अनिल शिंदे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी

Loading

अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. अनिल शिंदे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी

अमळनेरला महायुतीचे मंत्री अनिल पाटील ,महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदे व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्यामध्ये होणार तिरंगी लढत

अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी मुंबईमध्ये अनेक उमेदवारांनी तळ ठोकला असला तरी अखेर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी डॉ. अनिल शिंदे यांना मिळाली आहे.
उमेदवारी अर्ज 29 तारखेला डॉ. अनिल शिंदे भरणार आहेत. आज अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार शिरीष चौधरी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, ज्यासाठी त्यांचा मोठा मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.
मी डॉ. अनिल शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या असता, त्यांनी तेव्हा सांगितले होते की, “मलाच उमेदवारी मिळणार,” आणि त्यांचा हा शब्द खरा ठरला.
गणपती, विविध सण, आणि मुस्लिम धर्माचे सण यामध्ये डॉ. अनिल शिंदे यांची उपस्थिती आवर्जून राहिलेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले की, त्यांनी प्रचार कार्य सुरुवात केली होती आणि कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहायचे.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे, परंतु यासाठी खूप मोठी मेहनत लागणार आहे कारण समोर दोन मातब्बर उमेदवार आहेत. त्यांचा व कार्यकर्त्यांचा प्रचार जोराने सुरू आहे
पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी डॉ. अनिल शिंदेच्या प्रचारासाठी एकत्र येतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमळनेर तालुका विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. मागील निवडणुकीत माजी आमदार डॉ बी. एस. पाटील युतीचे उमेदवार असतांना काँग्रेस पक्षाच्या एडवोकेट डॉ. ललिता पाटील ह्या थोडया मतांनी पराभूत झाल्या होत्या.
काही वर्षांनी महाविकास आघाडीला ही उमेदवारी मिळालेली आहे. आता पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी किती मेहनत करावी हे महत्त्वाचे आहे, कारण उमेदवारी उशिरा मिळाल्यामुळे प्रचाराला कमी वेळ आहे. सध्या डॉ. अनिल शिंदे यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *