‘डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा’: शिक्षणातील नवकल्पना- आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे
![]()
‘डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा’: शिक्षणातील नवकल्पना- आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्याचे सुपुत्र श्री संदीपकुमार साळुंखे (आयकर आयुक्त, नागपूर विभाग) यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा’ हा उपक्रम मारवड व परिसर विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षभरापासून यशस्वीरित्या कार्यरत आहे.
या उपक्रमांतर्गत सुरु झालेल्या प्रायोगिक तत्वावर तालुक्यातील २० माध्यमिक शाळांची निवड करण्यात आली आहे. 2024-25 च्या पहिल्या शैक्षणिक सत्रात “डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा”ने तब्बल ४७ शाळाभेटी घेऊन प्रयोगशाळेतील व अभ्यासक्रमातील संकल्पनांचा ८३०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत असल्याचे दिसून येत आहे, तसेच ग्रामीण भागातील मुले स्वतः प्रयोग करून बघताना आढळत आहेत. संबंधित शाळेतील शिक्षकदेखील या प्रयोगशाळेच्या कार्यात नियमितपणे सहभाग घेण्यासाठी उत्सुक आहेत.
शिकल्यानंतर विद्यार्थ्यांची समज किती प्रमाणात वाढली हे जाणून घेण्यासाठी शाळा भेटीच्या दरम्यान सोप्या पद्धतीने चाचणी घेण्यात येते. या पूर्व-उत्तर चाचणीमुळे विद्यार्थी संकल्पनेबाबत अधिक विचार करताना दिसतात आणि संबंधित विषयांना आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित होतात.
भविष्यात, या उपक्रमाचे फलित अधिक स्पष्टपणे जाणवेल, असे शंका नाही. ‘डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा’ ने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात क्रांतिकारी बदल घडवण्यास सुरवात केली आहे, ज्यामुळे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनात अधिक प्रभावी विचार करण्यास मदत मिळत आहे.


