जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान  समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज
1 min read

जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज

Loading

जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान

समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज

‘शिवप्रेरणा जागर’ या महाराष्ट्र स्तरीय व्यापक जनचळवळी अंतर्गत *’सजग रहो’* या अभियानासाठीच्या पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, विलास पाटील (माजी माहिती आयुक्त महाराष्ट्र) अनिल भोकरे (सेवानिवृत्त प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग जळगाव) डी आर पाटील (विभागीय वनाधिकारी, वनविभाग जळगाव) वरिष्ठ अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल पी देशमुख,प्रसिद्ध नृत्यांगना डॉ.अपर्णा भट ,उद्योजक प्रकाशजी चौबे उपस्थित होते.

*’शिवप्रेरणा जागर’* अभियानाच्या अंतर्गत चालणाऱ्या *’सजग रहो’* या अभियानात या महाराष्ट्र समिती माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पद्मश्री नामदेव कांबळे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, माध्यमकर्मी उदय निरगुडकर, आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते क्षितिज गायकवाड अशी अनेक मंडळी सहभागी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे निंदनीय प्रयत्न समाजातील विविध घटकांकडून सातत्याने सुरू आहेत. संकुचित राजकीय स्वार्थासाठी विविध समुदायांमधे भयंकर विद्वेष पसरविण्याचे आणि क्षुल्लक समाजिक मुद्यांवरून समाजात दुही निर्माण करून, भोळ्याभाबड्या जनतेला एकमेकांविरुद्ध लढवण्याचेही प्रयोग अहमहमिकेने सुरू आहेत. काही भागात जिहादी मानसिकतेने डोके वर काढल्यामुळे राज्यातील सामाजिक शांतता आणि सौहार्द धोक्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर विदर्भासह महाराष्ट्रातील सज्जन शक्तीने ‘श्रेष्ठ महाराष्ट्र –विकसित महाराष्ट्र- सौहार्दयुक्त महाराष्ट्राचा संकल्प सोडला असून, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीसाठी ‘सजग रहो’ अभियान हाती घेतले आहे.
महाराष्ट्र ही शिवछत्रपतींची भूमी आहे. स्वधर्म, सुशासन आणि सामाजिक सौहार्द ही शिवछत्रपतींनी आपणा सर्वांना शिकवलेली सार्वकालिक सामाजिक मूल्ये आहेत. काही अराजकवादी प्रवृत्ती सुशासनाच्या प्रयत्नांनाही सुरुंग लावीत आहेत, यासाठी *‘सजग रहो’* अभियानात सहभागी झालेल्या नामवंत मंडळींनी राज्यातील अठरापगड जातींच्या लोकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या दहा वर्षापासून देशाची सर्व आघाड्यांवर महासत्ता होण्याकडे वेगवान वाटचाल सुरू झाली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी सर्व प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनांमार्फत होत आहेत. मात्र देशातील सर्वात विकसित प्रदेश असलेल्या, देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रात ही वाटचाल रोखण्यासाठी विविध मार्गांनी बुद्धिभेद करण्यात येत आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातील भिन्न जाती समूहांना एकत्र आणले. त्याच महाराष्ट्रात जातीय विद्वेष जाणीवपूर्वक पोसण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कुठल्याही संवेदनशील नागरिकाने अस्वस्थ व्हावे, असे वातावरण राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब ‘सजग रहो’ अभियानातील बुद्धिवाद्यांनी अधोरेखित केली आहे.

या समाजद्रोही त्रिधारांना पायबंद घालीत महाराष्ट्र हिताच्या लक्ष्याची विकसित भारताच्या स्वप्नाशी सांगड घालत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘श्रेष्ठ महाराष्ट्र –विकसित महाराष्ट्र- सौहार्दयुक्त महाराष्ट्र’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यात आरंभ करण्यात आलेल्या ‘सजग रहो’ अभियानास आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे निवेदन जळगाव जिल्ह्यातील संत, महंत, धर्मगुरू,उद्योजक, डॉक्टर्स, सीए, निवृत्त सरकारी अधिकारी, साहित्यिक, बुद्धिवंत, समाजधुरीण, पर्यावरणवादी, शिक्षणप्रेमी, कृषीतज्ज्ञ,आणि सिव्हिल सोसायटी कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या अभियानामार्फत सुरू झालेल्या उपक्रमांना आमचा सक्रिय पाठिंबा असून, जळगाव जिल्ह्यातील सुजाण जनतेने तन-मन-धनाने या अभियानात सहभागी व्हावे, अशी विनम्र प्रार्थना या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाला अनुमोदन देणाऱ्यांमध्ये सर्वश्री महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, विलास पाटील (माजी माहिती आयुक्त महाराष्ट्र),अनिल भोकरे (सेवानिवृत्त प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग, जळगाव) डी. आर. पाटील (विभागीय वन अधिकारी वनविभाग जळगाव) खानदेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, वरिष्ठ अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, शिक्षणतज्ञ अनिल राव,डॉ.भरत अमळकर (सामाजिक कार्यकर्ते), सातपुडा ऑटोमोबाईलचे किरण बच्छाव, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सुदर्शन नवाल, दाल परिवाराचे प्रेम कोगटा, शंकरभाई पटेल,(सॉ मिल उद्योजक)प्रसिद्ध नृत्यांगना डॉ.अपर्णा भट, राजेंद्र ननावरे (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य) विक्रम पाटील (ट्रान्सपोर्ट व्यावसायिक) रवींद्र ईसाई (योगशिक्षक)
नितीन पारगावकर (वास्तुविशारद) हरिशभाई मिलवाणी, अमरभाई कुकरेजा( उद्योजक), प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर एम.डी. उदासी, भालचंद्र पाटील (व्हेगा केमिकल्स)सुवर्णकार महेंद्र भाई कोठारी,राजेश ठोबरे (चाळीसगाव) डॉक्टर संदीप पाटील (रावेर) अँड.गुंजन वाघोदे (फैजपूर) उमेश पाटील (खिरोदा यावल) पंकज नारखेडे (प्रगतिशील शेतकरी, चिनावल) ॲड.कालिदास ठाकूर (भुसावळ )
आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *