एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात
![]()
एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात
उरुळी कांचन प्रतिनिधी – दिवाळी हा सण आनंद, प्रेम आणि सुसंवादाचा उत्सव आहे, आणि याच आनंदाचा विसर कुणाला न लागो म्हणून एंजल ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव माननीय श्री सचिन अग्निहोत्री यांच्या संकल्पनेतून आणि श्री अविनाश शेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एंजल हायस्कूलने दिला खास उपक्रम घेतला.
या उपक्रमाचं उद्दिष्ट समाजातील दुर्बल, गरीब आणि गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवणं हे होतं. शाळेच्या परिसरात सुमारे 50 कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले, ज्यामध्ये ऊस तोडणी कामगार, गवंडी कामगार आणि गरजू शेतमजूर यांचा समावेश होता.
उपक्रमाच्या वेळी कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रुंचा साठा दिसला आणि त्यांनी या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री चेतन सोनवणे सर आणि परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी गरजू व्यक्तींना योग्य त्या प्रमाणात शिधा वितरीत केला.
यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला, ज्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी झाला. एंजल हायस्कूलने घेतलेल्या या उपक्रमामुळे दिवाळी सणाचे खरे महत्त्व आणि समाजातील एकतेचा संदेश सर्वत्र पसरला आहे.

