रोटरी क्लब आणि आधार संस्था अमळनेर एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या मुला मुलींना दीपावली निमीत्त फराळ वाटप
1 min read

रोटरी क्लब आणि आधार संस्था अमळनेर एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या मुला मुलींना दीपावली निमीत्त फराळ वाटप

Loading

रोटरी क्लब आणि आधार संस्था अमळनेर एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या मुला मुलींना दीपावली निमीत्त फराळ वाटप

अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एच. आय. व्ही.सह जगणाऱ्या बालकांना
सकस आहार किराणा किट, प्रोटीन किट , व दिपावली फराळाचे वाटप करण्यात आले. यासाठी एका दात्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर 22500/ रुपयांचा किराणा देवु केला व दिपावलीचा फराळ आपल्या अमळनेर शहरातील नामांकित स्वादिष्ट नमकीनचे मालक श्री निलेश भाई पाटील व त्यांचे सहकारी श्री पप्पू पाटील* यांनी दिवाळीचा फराळ दिला तसेच अनिल भाई शहा व रंजन बेन शहा यांच्याकडून प्रोटीन किट देणगी स्वरूपातील दिवाळी भेट दिली.

 

रोटरी हॉल येथील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री अनिल भाई शहा होते व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भारती पाटील, अध्यक्ष आधार संस्था यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती किरण ताई , संग्राम संस्था सांगली* यांची उपस्थिती होती.
त्यांनी एचआयव्ही जगणाऱ्या मुला मुलींना याच्या विषयी जगण्याची हिंमत कशी निर्माण करावी यावर मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमासाठी आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद व रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला, विवेक देशमुख, कीर्ती कुमार कोठारी,प्रतीक जैन,अभिजीत
भांडारकर ,राजेंद्र जैन ,देवांग शहा ,रोनक संकलेचा,प्राचार्य डॉ .दिलीप भावसार यांची उपस्थिती होती.
यशवितेसाठी आधार बहुउद्देशीय संस्थेचे टीम मेंबर राकेश महाजन, मुरलीधर बिरारी ,पुनम पाटील ,दीप्ती शिरसाट दीपक विश्वेश्वर ,तौसिफ शेख यानी प्रयत्न केले व उपस्थिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन संजय कापडे यांनी केले. या प्रसंगी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेले दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *