साथ जनतेची, साद परिवर्तनाची..!* *दादा, आते तुमीच आमदार व्हा; जनतेचे कृषीभूषण साहेबराव पाटलांना साकडे!*
![]()
*साथ जनतेची, साद परिवर्तनाची..!*
*दादा, आते तुमीच आमदार व्हा; जनतेचे कृषीभूषण साहेबराव पाटलांना साकडे!*
विधानसभा निवडणुकीत अमळनेर मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, पक्षातीलच काही जण त्यांच्या नावाला विरोध करत आहे. असे असले तरी मतदारसंघातील जनता ही साहेबराव पाटील यांच्या पाठीशी असून, ‘दादा आते तुम्हीच आमदार व्हा’..साद परिवर्तनाची आणि जनतेची साथ आपल्याला आहे, त्यामुळे तुम्ही लढाच असे साकडेच मतदारसंघातील जनता कृषीभूषण साहेबराव पाटील यांना घालत आहे.
अमळनेर मतदारसंघात 2009 मध्ये कृषीभूषण साहेबराव पाटील हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. साहेबराव पाटील यांनी निवडून आल्यानंतर ‘एकच वादा अजितदादा’ असा नारा देवून त्यांच्या माध्यमातून कित्येक वर्षापासून मरणासन्न अवस्थेत असलेल्या पाडळसे प्रकल्पाचे काम मार्गी लावून एक रकमी मोठा निधी खेचून आणला होता. परिणामी धरणात पाणी अडविण्याचे श्रेय हे कृषीभूषण साहेबराव पाटील यांनाच दिले जाते. इतकेच नव्हे तर मतदारसंघातील विविध भागातील सिंचनाचा प्रश्न त्यांनी सोडवून शेतकर्यांना न्याय दिला आहे. विकासाचा अनुशेष त्यांनी भरून काढला हे विशेष! त्यानंतर त्यांनी अमळनेर पालिकेच्या माध्यमातूनही शहराचा कायापालट केला आहे. शहरातील विविध पूल, रस्त्यांची कामे, शहराचे सौंदर्यीकरणात झालेली वाढ, स्वच्छता यात साहेबराव पाटील यांना शहरवासीय विकासपुरूष मानतात. मात्र, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अनिल भाईदास पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून मोठा त्याग केल्याची भावना जनतेत आहे. सध्या मोठी टक्केवारी घेऊन कामे होत असल्याने कामात गुणवत्तेचा बोजवारा उडाला आहे. त्यातही कामे फक्त नावालाच दिसत असून, प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. मतदारसंघातील शहरासह ग्रामीण भागातील रस्ते, शेतरस्ते, सिंचनाचा पुन्हा बोजवारा उडाला आहे. आता परिवर्तनाची गरज असून, ‘दादा तुम्हीच आते आमदार व्हवाले पाहिजेत’, दादा, तुम्ही तुतारी फुंकाच आणि पुन्हा आमदार होवून मतदारसंघात परिवर्तन घडवून आणा अशी आर्त हाक जनतेतून उमटताना दिसून येत आहे.
*शेतकरी वैफल्यग्रस्त!*
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी कमालीचा हताश झाला आहे. तसेच 2023 पासूनचा पीक विम्याचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही. 2023 ला ही दुष्काळ असताना जाहीर झालेला नाही. यंदाही शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घासही ऐन दिवाळीत निसर्गाने हिरावून घेतला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असून, निवेदने आंदोलनेही झालेली पहावयास मिळत आहे. मदत, पुनर्वसन मंत्र्यांचा मतदारसंघ असूनही शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून, शेतकरी कमालीचे वैतागले आहेत. यासाठी शेतकर्यांचा कळवळा असलेलाच लोकप्रतिनिधी हवा. यासाठी साहेबराव पाटील यांना जनता आता निवडणुकीत उभे राहण्या सदर्भात भावनिक साद घालत आहे.
*’विकाऊ मतदारसंघ’डाग पुसायचा आहे..*
अमळनेर मतदारसंघ हा पैशांनी विकला जातो अशी सूज्ञ नागरिकांमध्ये भावना झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत पाचशेच्या नोटने अमळनेर मतदारसंघ विकला गेल्याचा शिक्काच जणू लागला आहे. तसेच सद्यस्थितीत कॅबिनेट मंत्रीही आता शिरीष चौधरी यांचे नाव न घेता ‘मी बूच्चन विकत न घेता बाटलीच विकत घेईल’ अशी भाषा करत आहेत. एकीकडे धनदांडगे शिरीष चौधरी व दुसरीकडे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील हे बलाढ्य उमदेवार असले तरी प्रामाणिक मतदार हा पैशाला न भूलता साहेबराव पाटील यांना विकासासाठी निवडून देईल. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विकावू मतदारसंघ हा डाग आता पुसून टाकतील एवढे मात्र निश्चित!

