विजयसिंग आधारसिंग पवार: शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व
![]()
वाढदिवस विशेष-
विजयसिंग आधारसिंग पवार: शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व
**पद:** उपशिक्षक, भिका यशोद चौधरी हायस्कूल, शिरसाळे, तालुका अमळनेर
कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात, तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळझाडे लावा आणि पिढ्यांसाठी तरच करायची असेल तर माणसं पेरा!
या उक्तीप्रमाणे विजयसिंह पवार स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतः व अधिकाऱ्यांच्या कुशल मार्गदर्शनाने
अनेक विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करीत आहेत….
विजयसिंग आधारसिंग पवार हे शिरसाळे सारख्या छोट्याशा गावात उपशिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्चतम सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 2010 पासून त्यांनी महाराष्ट्रातील एकग्रता करिअर डेव्हेलोपमेंट पॉईंट या नावाने संपूर्णपणे मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे.
या केंद्रामुळे शिरसाळे येथील विद्यार्थ्यांना दर रविवारी मोफत मार्गदर्शन मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धा परीक्षांची जाणीव जागरूक झाली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात एक प्रशस्त अभ्यासिका सुरू करण्यात आली, ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त तरुण विविध शासकीय सेवांमध्ये प्रवेश घेतले आहेत.
विजयसिंग पवार यांचे कार्य केवळ शिरसाळेपर्यंत मर्यादित नसून, संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्यासह एकत्रितपणे ग्रंथालयात “पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” सुरू केले आहे. या केंद्रामार्फत एमपीएससी व यूपीएससी मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात.
या उपक्रमाद्वारे तज्ञ मार्गदर्शक व प्रशासनातील सन्माननीय अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. प्रशस्त लायब्ररी व दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीत खूप फायदा होत आहे.
विजयसिंग पवार यांच्या या कार्यामुळे दरवर्षी शेकडो विद्यार्थी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय ही संस्था तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सोय आहे ज्यामुळे त्यांना उच्च शैक्षणिक गंतव्य गाठता येत आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये विजयसिंग पवार यांचा हा उत्साही व उदार दृष्टिकोन निश्चीतपणे अनेक तरुणांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात प्रभावी ठरला आहे.
अनेक उपेक्षित तळागाळातले विद्यार्थी यांना योग्य मार्गदर्शन विजयसिंह पवार सर करत आहे त्यांना या कामात मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ, अध्यक्ष व संचालक मंडळ पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आजी माजी संचालक मंडळ, वेगवेगळया क्षेत्रातील अधिकारी वर्ग, मित्र परीवार, संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ व साडे गावातील ग्रामस्थ मंडळ विद्यार्थी यांचे मिळते..
नियमित मिळत असते मित्रपरिवार यांचे मिळते …
पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राला मागच्या वर्षी मराठी लाईव्ह न्युज च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.. या अगोदरही ते अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत…

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द..
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
शुभेच्छुक
ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर
9860352960

