संदीप साहेबराव बोरसे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
श्री. संदीप साहेबराव बोरसे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील किसन दाजी पाटील हायस्कूल सावखेडा शाळेचे उपशिक्षक श्री. संदीप साहेबराव बोरसे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नुकतेच धुळे येथील नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कुटुंबासह सन्मानित करण्यात आले.
नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारतांना श्री. संदिप बोरसे सर, त्यांच्या पत्नी श्रीमती. वृषाली बोरसे, मुलगा हर्षद बोरसे, सरांची आई श्रीमती.लताबाई बोरसे, सरांचा भाऊ श्री. रुपेश बोरसे व नातेवाईक उपस्थित होते.
श्री. संदीप साहेबराव बोरसे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी सरांचा सत्कार केला. तसेच किसन दाजी पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू, भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सत्कार केला , सावखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख, केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, नातेवाईक,मित्र परिवार, गावातील नागरिक, यांनी श्री. संदिप बोरसे सरांचे अभिनंदन केले.

