आरोग्य विमा कार्यालयाचा भव्य शुभारंभ
1 min read

आरोग्य विमा कार्यालयाचा भव्य शुभारंभ

Loading

आरोग्य विमा कार्यालयाचा भव्य शुभारंभ

अमळनेर प्रतिनिधी
ह. भ. प. प. प.पु. प्रसाद महाराज यांच्या आशिर्वादाने साडे तीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असलेला दसरा (विजया दशमी) चे औचित्य साधुन जनहितार्थ भारतातील सर्वात अग्रेसर असलेली आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ च्या ऑफिस चे उदघाटन न्यायालय ते स्टेशन रोड वरील प्रबुद्ध काॅलनीच्या समोर असलेले विवेकानंद बिल्डर्स टाॅवरच्या तळमजला येथे मोठ्या उत्साहात प्रसिद्ध सर्जन डॉ अनिल शिंदे, डॉ संदिप जोशी, हेल्थ इन्शुरन्स एरीया मॅनेजर श्री अरुणा महाजन सर, धुळे जिल्हा शाखेचे व्यवस्थापक श्री मंदार कुळकर्णी, सिनीयर सेल्स मॅनेजर सौ हेमलता जोशी इत्यादींच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉ अक्षय कुळकर्णी, डॉ निखिल बहुगुणे, डॉ शरद बाविस्कर, डॉ अपर्णा मुठे, डॉ महेश पाटील, डॉ राजु शहा, डॉ विशाल बडगुजर व समस्त आरोग्य विमा प्रतिनिधी उपस्थित होते. सदर सोहळा यशस्वीतेसाठी संत सखाराम महाराज वाडी संस्थानाचे व्यवस्थापक श्री रमेश जोशी, ज्ञानेश्वर पाठशाळेचे अध्यक्ष श्री सुनील जोशी यांनी विशेष परीश्रम घेतलेत.
या प्रसंगी उपस्थितांन मध्ये उल्लेख होतांना सिनीयर सेल्स मॅनेजर सौ हेमलता जोशी ह्या गत १० वर्षा पासून आरोग्य विम्याच्या माध्यमातून अविरतपणे कार्य करीत आहेत. आपल्या नगरीत आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून देत, विमा धारकांना तात्काळ सेवा मिळावी या हेतूने दूरदृष्टीचा विचार करुन मध्यवर्ती परीसरात स्टार हेल्थ मेडिकल इन्शुरन्स च्या ऑफिस चे भव्य दालन निर्माण केले. त्यांच्या ह्या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक , स्वागत व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *