ग्रंथालये केवळ ज्ञानाचे भंडार नाहीत, तर त्या आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्वपूर्ण अंग  महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. जैन यांचे प्रतिपादन  प्रताप महाविद्यालयातील इतिहास व संशोधन विभागातील विद्यार्थ्यांनी दिली साने गुरुजी ग्रंथालयाला भेट…
1 min read

ग्रंथालये केवळ ज्ञानाचे भंडार नाहीत, तर त्या आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्वपूर्ण अंग महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. जैन यांचे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयातील इतिहास व संशोधन विभागातील विद्यार्थ्यांनी दिली साने गुरुजी ग्रंथालयाला भेट…

Loading

ग्रंथालये केवळ ज्ञानाचे भंडार नाहीत, तर त्या आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्वपूर्ण अंग

महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. जैन यांचे प्रतिपादन

प्रताप महाविद्यालयातील इतिहास व संशोधन विभागातील विद्यार्थ्यांनी दिली साने गुरुजी ग्रंथालयाला भेट…

अमळनेर प्रतिनिधी
15 ऑक्टोबर वाचन प्रेरणादिनाचे औचित्य साधून खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर संचलित, प्रताप महाविद्यालयातील इतिहास व संशोधन विभागातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला भेट दिली, विद्यार्थ्यांसमवेत प्रताप कॉलेजचे प्राचार्य श्री. ए. बी. जैन सर, प्रा. धनंजय चौधरी, विभागप्रमुख, प्रा. अवित पाटील,प्रा.प्रसाद मुठे हे उपस्थित होते

 

प्राचार्य जैन सरांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणेसाठी ग्रंथालये किती उपयुक्त आहेत याचे महत्व विषद केले, त्याअनुषंगाने आपल्या अमळनेर शहरात शतकोत्तर वाटचाल करणारे पूज्य सानेगुरुजी ग्रंथालयाचे अंमळनेर शहराचा सांस्कृतिक,साहित्यिक, क्षेत्रातील वारसा जपण्यासाठीच योगदाना विषयी गौरोवोददगार काढले. विद्यार्थ्यांनी ग्रंथसंपदेतील अनेक पुस्तके चाळलीत इतकेच नव्हे तर ग्रंथालयाच्या आवा राची, ग्रंथालयाची साफसफाई केली.

 

सुरवातीला ग्रंथलायतर्फ मा. प्राचार्य श्री. ए. बी. जैन, प्रा. धनंजय चौधरी, विभागप्रमुख, प्रा. अवित पाटील, प्रा. प्रसाद मुठे यांचे स्वागत सचिव प्रकाश वाघ व संचालक दिपक वाल्हे यांनी केले, सचिव प्रकाश वाघ यांनी ग्रंथालतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी व उपलब्ध ग्रंथसंपदा, वर्तमानपत्र, मासिक याचेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. महाविद्यालयाने ग्रंथालयाशी सामंजस्य करार केला असून संयुक्तपणे उपक्रम राबविण्याचं आश्वाशीत केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *