कापूस व सोयाबीन अनुदानात ई-पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्या व त्वरित अतिवृष्टीचे पंचनामे झाले असूनही भरपाई नाही, राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे तहसीलदार यांना निवेदन
![]()
कापूस व सोयाबीन अनुदानात ई-पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्या व त्वरित अतिवृष्टीचे पंचनामे झाले असूनही भरपाई नाही..
राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे तहसीलदार यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी- जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मंडळामध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या व कापूस व सोयाबीन अनुदानात ई- पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान त्वरित द्या व अमळनेर येथे ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले असूनही भरपाई अजून मिळालेली नाही ,अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या टाटा ईशा कंपनीच्या बोगस कापसाच्या बियाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या , 2023 -24 च्या ऑनलाईन तक्रार केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा द्या या मागण्यासाठी
निवेदन राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी दिले..
जळगाव जिल्ह्यातील 80 टक्के मंडळामध्ये जून जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये सरासरी पर्जन्य पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली या झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वात पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे तरी संबंधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत त्यांना पोहोचावी असे पत्रकात म्हटले आहे..
शासनाने घोषित केलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानातून ई-पिक पेरा नसलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला आहे तरी या शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव आलेले नाही आपण लवकरात लवकर याची नोंद घ्यावी व या शेतकऱ्यांना न्याय द्यावा..
अमळनेर तालुक्यात ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली आहे नुकसानीचे पंचनामे ही झाले मागील तीन वर्षापासून शासन दरबारी निवेदन व आंदोलन करून देखील शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही तरी याची आपण लवकरात लवकर दखल घेऊन नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करावी..
तालुक्यातील 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन टाटा ईशा कंपनीच्या कापूस बियाणे अंतर्गत लागवड केलेली आहे 120 दिवस झाले तरी पिकाला कोणतेही फळ आले नाही तरी त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
रब्बी हंगाम 2023 24 मध्ये अनेक वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रारी केलेले आहेत तरी या शेतकऱ्यांना तात्काळ विम्याची रक्कम वर्ग करण्यात यावी.. असे आशयाचे निवेदन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना देण्यात आले यावेळी निवेदन देतेवेळी राष्ट्रीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष सुकलाल पाटील,
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील,शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील, सुरेश किरण पाटील ,प्रताप नागराज पाटील ,त्र्यंबक पाटील, प्राध्यापक श्याम पाटील, भास्करराव ठाकरे ,विनोद बोरसे, योगेश शिसोदे, मनोज सनेर, डी एम पाटील, विनोद शिंदे सह अनेक संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते..

