खरीप हंगाम 2024 साठी ओला दुष्काळ जाहीर करून उपायोजनासह सह कर्जमाफी द्या,  कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे सह उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री कडे पत्राद्वारे मागणी
1 min read

खरीप हंगाम 2024 साठी ओला दुष्काळ जाहीर करून उपायोजनासह सह कर्जमाफी द्या, कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे सह उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री कडे पत्राद्वारे मागणी

Loading

खरीप हंगाम 2024 साठी ओला दुष्काळ जाहीर करून उपायोजनासह सह कर्जमाफी द्या

कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे सह उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री कडे पत्राद्वारे मागणी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन(
खरीप हंगाम जून ते सप्टेंबर 2024 आणि 13 ऑक्टोबर 2024 अखेर अमळनेर तालुक्यात 984.26 मिलिमीटर आणि पारोळा तालुक्यात 757 मिली लिटर म्हणजे सरासरीपेक्षा अधिक सततचा पाऊस विजेचा कडकडासह वादळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम 2024 हातातून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हताश होऊन दुहेरी संकटात सापडला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांची शासनप्रती असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्या साठी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी सह तातडीने आर्थिक मदत करण्याचा सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी असे अमळनेर तालुक्याचे माजी आमदार ,कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *