ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात “दुनिया मेरी मुठ्ठी मे” विषयावर व्याख्यान
1 min read

ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात “दुनिया मेरी मुठ्ठी मे” विषयावर व्याख्यान

Loading

ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात “दुनिया मेरी मुठ्ठी मे” विषयावर व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी
ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय रोटरी क्लब अंतर्गत इंट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून आयोजित 7*7*7 उपक्रमात श्री पंकज व्यवहारे सरांनी “दुनिया मेरी मुठ्ठी मे” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानात श्री व्यवहारे सरांनी “Akash” या शब्दाची स्पेलिंग ओळख करून दिली आणि प्रत्येक अक्षराचा अर्थ विद्यार्थ्यांकडून समजून घेतला.

यामध्ये, ज्यावेळी कोणत्याही विद्यार्थ्याने अचूक उत्तर दिलं, त्याला बक्षीस म्हणून एक पेन दिला गेला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचा अनुभव झाला. संपूर्ण सेशन कुतूहलपूर्ण आणि आनंददायी अनुभवाने संपन्न झाले, ज्यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे सर, तसेच इंट्रॅक्ट क्लबचे समन्वयक श्री अतुल पाटील सर आणि श्री विवेक मोरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 9 वी ब च्या विद्यार्थिनी कु. भूमिका चौधरी यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन 9 वी ब च्या विद्यार्थी कृष्णा झांबरे यांनी केले.
फलक लेखन श्री निर्मल चतुर सर यांनी केले. यामुळे व्याख्यानाचे चौथे पुष्प नाविन्यपूर्ण रितीने संपन्न झाले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांचे विचार व प्रज्ञा विकसित होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *