विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन
1 min read

विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन

Loading

विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन

अमळनेर :

येथील श्री मंगळग्रह मंदिरात पोलीस निरीक्षक विकास देवरे, गोपनीय शाखेचे अमलदार सिध्दांत शिसोदे, पो.कॉ. योगेश महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यालय प्रमुख हेमंत सैंदाणे, व्यवस्था प्रमुख पंडित नाईक, कार्यवाह देवेंद्र तायडे, सह कार्यवाह राकेश शर्मा यांच्या शुभ हस्ते शस्त्रांचे पूजन करण्यात आले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी व वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले.
यावेळी श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवता, मंगळेश्वरी श्री भूमीमाता, श्री पंचमुखी हनुमान यांच्याही मूर्ती आकर्षक पद्धतीने सजविण्यात आल्या होत्या. मंदिरासमोरील सभामंडपात श्री मंगळग्रह देवतेची प्रतिमा तसेच पूजेसाठी शमी व आपट्याच्या पानांसह विविध शस्त्रे आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती. श्री मंगळग्रह देवतेची ही प्रतिमा मंदिरात आलेल्या भाविकांसाठी आकर्षण ठरली. अनेक भाविकांनी या प्रतिमेसह फोटो व सेल्फी काढले.

 

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, सदस्य विवेक अहिरराव, मिलिंद पाटील, रवींद्र बोरसे, राहुल बहिरम, मधुसूदन विसावे, निरंजन पेंढारे, दयाराम पाटील, किरण चव्हाण, रजनीकांत पाटील, उमाकांत ठाकूर, भरत पाटील आदींसह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *