संस्कारक्षम मूल्यांची जोपासना काळाची गरज.. या अनुषंगाने अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत पाटी पूजनाचा कार्यक्रम..
![]()
संस्कारक्षम मूल्यांची जोपासना काळाची गरज.. या अनुषंगाने अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत पाटी पूजनाचा कार्यक्रम..
जळगाव प्रतिनिधी
जळगाव येथील अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत विजयादशमीनिमित्त डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या हस्ते पाटिपूजन करण्यात आले. डायटचे अधिव्याख्याता सी.डी.साळुंखे सरांनी सरस्वतीचे म्हणजेच पार्टीचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी पाटीपूजन दसऱ्याला का करतात ते सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली राठोड यांनी केले तर आभार स्नेहल ठाकूर यांनी केले. कार्यक्रमानंतर संगीता वाघुळदे यांनी कुमारीका पूजन केले व विद्यार्थिनींना वस्तूंचे वाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा धांडे, योगिता तळेले,नीलिमा वारके व ज्योती इंगळे यांनी सहकार्य केले.

