शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून नेणारा मुसळधार अवकाळी पाऊस
![]()
शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून नेणारा मुसळधार अवकाळी पाऊस
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुक्यातील आठही मंडळात सुरू झालेल्या धो धो पावसामुळे वेचणी ला आलेला कापुस व मक्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्का खरेदी करून ठेवला आहे या पावसाचा फटका व्यापाऱ्यांना देखील बसला. तरी ज्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असेल त्यांनी तात्काळ पिकविम्याच्या ॲप वर ऑनलाईन तक्रार करावी तसेच तलाठी व तहसीलदार यांना लेखी तक्रार करून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारोळा तहसीलदारांकडे पंचनाम्यासाठी लेखी तक्रार करावी असे किसान काग्रेसचे जिल्हाध्यक्ष
प्रा.सुभाष पाटील यांनी केले आहे.

