मुश्ताक करिमी यांना ‘उर्दू की मोहब्बत मे’ पुरस्कार प्रदान
![]()
मुश्ताक करिमी यांना ‘उर्दू की मोहब्बत मे’ पुरस्कार प्रदान
जळगाव: मुंबई येथील नामांकित संस्था क्विझ टाइम तर्फे जळगावातील साहित्यिक व उर्दू पत्रकार मुश्ताक करिमी यांना उर्दू भाषेच्या प्रचार, प्रसार, उन्नती व विकास आणि त्यांच्या लेखनाबाबत यावर्षीचा ‘उर्दू की मोहब्बत मे’ ऐतराफिया अवार्ड प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना हामिद इकबाल सिद्दीकी व जाहेदा सिद्दीकी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृती चिन्ह, मानपत्र व शाल हे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात उर्दू साहित्यकांची मोठी उपस्थिती होती. मुंबई विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहा मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुश्ताक करिमी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मातृभाषेचे आपल्यावर आपल्या आई सारखेच उपकार असतात त्यांची परतफेड केलीच पाहिजे असे कृतज्ञतापूर्वक उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.

