सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे-सौ सुलभा पाटील, देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालसंस्कार, व्यसनमुक्ती व ध्यानावर झाले मार्गदर्शन
![]()
सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे-सौ सुलभा पाटील
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालसंस्कार, व्यसनमुक्ती व ध्यानावर झाले मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी-
माणूसकी एकच जात आहे,माणसात देव शोधा,खोटे बोलू नका,व्यसनात
पैसा जातो, बुद्धी काम करते का? त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे.
तंबाखूला संतांनी काय म्हटले माहिती आहे का?तंबाखू ही पापाची खाण आहे..तंबाखूमुळे कॅन्सर आजाराची लागण होते.मासांहार टाळला पाहिजे,
सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे आहे, असे देवगांव देवळी ता.अमळनेर येथे रामद्वारा जळगाव संस्थेच्या माध्यमातून बाल संस्कार ,व्यसनमुक्ती व ध्यानधारणा या विषयावर मार्गदर्शन सौ सुलभा पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या कीमेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे, ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरुकता यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम हा आपल्या शरिराच्या हालचालींसाठी कार्य करते.
मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर ताण येतो. काहीवेळा आपल्याला ते कळत नाही, परंतु यामुळे आपल्या डोळ्यांना नुकसान होऊ शकते. आपले डोळे शरीराच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत. मोबाईलच्या निळ्या स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकते.
यामुळे गंभीररित्या डोकेदुखी, डोळा दुखणे आणि डोळे कोरडे होऊ शकतात.व. लवकर मोतीबिंदूंचे ऑपरेशन करण्याची वेळ येते…
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन,सौ सुलभा पाटील, सौ संगिता मुठे होते..
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय.आर महाजन यांनी केले. कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शिक्षक आय.आर महाजन,एस.के.महाजन,एच.ओ.माळी,
अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील उपस्थित होते..



