पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!
1 min read

पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!

Loading

*महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)*
************************ *महा.फेडरेशन अपडेट्स!*
*************************
*पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!*
*************************
राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बहुसंख्य जिल्ह्यात सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत.ज्या संस्थांमध्ये सभासदांचे मन व संस्थेचा आर्थिक व्यवहार यांचे संतुलन साधून कामकाज केले जाते त्या पतसंस्थेचा विकास पारदर्शी होण्यास मदत होते.शिवाय जिल्हा पतसंस्थेची धोरणे जिल्हा शिक्षक संघटना व चळवळीस पूरक व सहाय्यक ठरली पाहिजे.आजकाल काही जिल्ह्यांमध्ये पतसंस्थेपेक्षा जिल्हा शिक्षक संघटनेस दुय्यम स्थान दिले.ही बाब चुकीची आहे.पतसंस्था शिक्षकांची अर्थवाहिनी आहे तर शिक्षक संघटना जीवनवाहिनी आहे याचे स्मरण कार्यकर्त्यांनी ठेवण्याची गरज आहे.
आदरणीय शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे सरांनी पतसंस्था व संघटनेच्या कार्यामध्ये उत्तम समन्वय राखून शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणूनच शिक्षकांनी पतसंस्थेच्या सभागृहाचे”शिवाजीराजे निरगुडे सभागृह”असे कृतज्ञतापूर्वक नामकरण केले.शिक्षक नेत्याचे त्यांचे हयातीत व त्यांचे उपस्थितीत नामकरण होण्याचे हे एक असाधारण उदाहरण आहे. याबद्दल ज्ञानेश्वर कानडे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)च्या वतीने संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन तसेच निरगुडे सरांचेही अभिनंदन करून त्यांना आरोग्यदायी शतायुषी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच महाराष्ट्र फेडरेशन च्या वतीने खासदार भास्करराव भगरे यांच्या विजयाबद्दल सत्कार करण्यात आला.

 

नुकताच निफाड तालुका तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेच्या सभागृहाच्या उदघाटन व नामकरण सोहळा निफाड (नाशिक)येथे माननीय खासदार राजाभाऊ वाजे,खासदार भास्करराव भगरे सर यांचे हस्ते व माजी आमदार अनिल अण्णा कदम तसेचअनेक मान्यवरांसह जिल्ह्यातील शिक्षक संघटना/पतसंस्था पदाधिकारी,शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
धन्यवाद!
ज्ञानेश्वर कानडे,
पालघर
ऑक्टो.11,2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *