अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव,जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग
![]()
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव…
जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग
अमळनेर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव जळगाव मधील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवजीवन प्लस सुपर शॉपचे संचालक अनिलभाई कांकरिया ,श्री. प्रविण सिंग (झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र),श्री. योगेश पाटील (सहायक आयुक्त समाज कल्याण, जळगाव),श्री. विजय रामसिंग (जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव),सौ.माधुरी भागवत,(वै.सा.का.दिव्यांग कल्याण विभाग जळगाव),श्री.संदिप घोरपडे सर (कार्याध्यक्ष, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा) यांच्या हस्ते चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील सहभागी विशेष विद्यार्थी,विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ” विशेष शाळा काळाची गरज’ ही समाज प्रबोधनपर नाटिका सादर केली.उपस्थित प्रमुख पाहुणे व श्रोते यांचा खुपच प्रतिसाद या नाटकाला मिळाला. तसेच शाळा मुख्याध्यापक मनिष जाधव यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले,व सहभागी विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र,व विशेष शिक्षक श्री.हेमंत महाजन, श्री.आर.एस.शेलकर,श्री. जगदीश सोनवणे,श्री.प्रशांत महाजन, श्री.विवेक पाटील,,श्रीमती.संगिता महाजन, श्री. कुणाल महाजन , श्री. राजेंद्र महाजन,श्री.राजू माळी यांना सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब.डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

