प्रताप मध्ये रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली
1 min read

प्रताप मध्ये रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Loading

प्रताप मध्ये रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली
————————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),याठिकाणी पद्यभूषण रतन टाटा हे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबई येथे त्यांचे दुःखद निधन झाले. भारतीय उद्योग क्षेत्रात गेल्या 144 वर्षा पासून टाटा समूह कार्यरत आहे.रतन टाटा यांनी 1962 पासूनच उदयोग क्षेत्रात सक्रिय अभ्यास करीत होते, त्यांनी 1991 नंतर उद्योगास भारतीयपणाची ओळख करून दिली.ते दानशूर होते तसेच त्यांनी आपल्या विचारात माणुस केंद्र स्थानी ठेऊन सामाजिक बांधिलकी जपणारे रतन टाटा यांच्या देहरूपी जाण्याने प्रताप कॉलेज स्टाफने या निधना बद्दल दुःख व्यक्त केले.सर्वांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ.अरुण जैन व डॉ.विजय तुंटे यांनी रतन टाटा यांच्या समर्पित कार्यावर प्रकाश टाकला,या प्रसंगी खा.शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.पराग पाटील,उपप्राचार्या डॉ.कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ.व्ही बी मांटे, कुलसचिव राकेश निळे,डॉ.मुकेश भोळे यांच्यासह प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *