नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील
1 min read

नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील

Loading

नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, नव्या पिढीने या लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे.असे मराठी वाड्:मय मंडळाच्या . तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील संस्थापक अध्यक्ष खानदेश लोकरंग फाउंडेशन नगरदेवळा ता. पाचोरा यांनी व्यक्त केली..
शाहीर पाटील पुढे म्हणाले की
पोवाडा म्हणजे “वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या मते बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा”, तरी सुद्धा पोवाडा म्हणजे ठासून स्तुती करणे किंवा वीरांच्या पराक्रमाचे स्तुतीपर गेय कवन असते..
‘श्राेता कलेला आधार खरा, तुम्हा पहिला मानाचा मुजरा’ हा शाहिरी मुजराही सादर केला. त्यातून त्यांनी श्राेता असेल तर कलेला महत्त्व आहे, हे पटवून दिले. ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ या गीतातून त्यांनी समाजकारण, राजकारणावर बाेचरी टिका केली. शाहिरी ही महाराष्ट्राची शान आहे. पाेवाड्याची साधना करण्यासाठी तरुण वर्ग तयार हाेत नाही. त्याचं कारण त्यांना सवंग लाेकप्रियता मिळणाऱ्या गाेष्टी आवडतात.
पहाडी आवाजात पाेवाडा गायन संवाद साधत असताना शिवाजीराव पाटील यांनी लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पाेवाडे सादर केले. अहिराणीतील प्रबाेधनपर गीतरचना म्हटले. क्षेत्र काेणतेही असू द्या, स्वत:ला उत्तमपणे घडवण्यासाठी कलाेपासना करायला हवी, असे त्यांनी नमूद केले.
सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरही पाेवाडे सादर केले जातात. विषयांची मर्यादा या लाेककलेला नाही. महाराष्ट्राचे वैभव असलेली ही कला टिकवून ठेवण्यासाठी नव्या पिढीने साधना म्हणून ती जाेपासावी. नव्या पिढीने या काेलकलेकडे गांभिर्याने बघायला हवे. गावागावांत शाहिरी गायनाचे कार्यक्रम हाेणे अपेक्षित आहे.
देशभक्ती पर पोवाडे,खान्देशवर पोवाडा
छत्रपती शिवाजी महाराज अहिराणी गित
फितूर खंडोजी खोपडे पोवाडा,अहिराणी नाटीका सादर करत
पोशाख संस्कृती महीलांनी आत्मपरीक्षण करा असे सांगितले,माणसाचे कर्तृत्व चांगले असेल तर च पोवाडा लिहला जातो असे सांगितले.. श्रोत्यांनी शायरी केलेला उत्स्फूर्तपणे दाद दिली आणि शाहिर यांच्या उत्कृष्ट पोवाड्यांना आर्थिक भेट दिली..
विचारपिठावर मराठी वाड्:मय मंडळाच्या तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील संस्थापक अध्यक्ष खानदेश लोकरंग फाउंडेशन नगरदेवळा ता. पाचोरा व प्रमुख अतिथी के .डी पाटील प्राचार्य धनदाई महाविद्यालय अमळनेर, आरोग्य सेवक डॉ शरद दयाराम शिंदे व मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,सदस्य प्रा.शिला पाटील, स्नेहा
एकतारे होते.
शाहीरचा परीचय संदीप घोरपडे यांनी केला सुत्रसंचालन करत असतांना मराठी वाड्ड:मय मंडळाचे सदस्य घोरपडे यांनी शाहीरी, पोवाडा, व कला संस्कृती वर प्रकाशझोत टाकला..
यावेळी देणगीदारांचा सन्मान व प्रमुख अतिथी व शाहीर व सहकारी कलाकार यांचा सत्कार करण्यात आला.. प्रमुख अतिथी के.डी.पाटील मनोगत व्यक्त केले.
व्याख्यान मालीका यशस्वी करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ
सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे,
कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी
सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल
भागवत, स्नेहा एकतारे, संदीप
घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब
मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम
पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत
सदस्य अजय केले, बजरंगलाल
अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी
केले आहे.
सुत्रसंचालन मराठी वाड्:मय मंडळाचे
उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,
सदस्य संदीप घोरपडे यांनी केले. यावेळी श्रोता बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *