आई जगदंबे सर्वांना व महिलांना न्यायाचे दार उघड आणि जनतेच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येऊ दे…
![]()
आई जगदंबे सर्वांना व महिलांना न्यायाचे दार उघड आणि जनतेच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येऊ दे…
उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन
तुळजापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीच्या चौथ्या माळेचे औचित्य साधत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी देवीची धार्मिक पूजा विधी करत देवीला साडीचोळी अर्पण केली. यावेळी त्यांनी देवीकडे जनतेच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येऊ दे असे गाऱ्हाणे मांडले.

तसेच संपूर्ण जगात आदिशक्तीचा नवरात्री उत्सव सुरू आहे. देवीच्या प्रत्येक रुपात तिची वेगवेगळी वाहने आणि शस्त्रे आहेत तसंच महिलांची शक्ती पुढे येण्यासाठी, स्त्रियांची विषमतेपासून मुक्ती होण्याकरिता शस्त्राप्रमाणेच वेगवेगळ्या आयुधांद्वारे कायद्यांच्या अंमलबजावणीच्या यंत्रणांचा वापर करण्यात येईल. अशा प्रकारच्या शुभेच्छा राज्यातील भगिनींना आणि बांधवांना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
याप्रसंगी, आरती बसवंत जिल्हाप्रमुख परिवार व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

