अमळनेर तालुक्यातील पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा संघर्ष: एक शोकांतिका, 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले ना.अनिल पाटील यांना निवेदन, पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा आक्रोश जयश्री ताईंनी नामदार अनिल दादांपर्यंत पोहचवा…
1 min read

अमळनेर तालुक्यातील पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा संघर्ष: एक शोकांतिका, 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले ना.अनिल पाटील यांना निवेदन, पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा आक्रोश जयश्री ताईंनी नामदार अनिल दादांपर्यंत पोहचवा…

Loading

अमळनेर तालुक्यातील पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा संघर्ष: एक शोकांतिका

2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले ना.अनिल पाटील यांना निवेदन…

पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा आक्रोश जयश्री ताईंनी नामदार अनिल दादांपर्यंत पोहचवा…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती व नंतर टप्याटप्याने अनुदानावर आलेले पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांनी अमळनेर तालुक्यात एकत्र येऊन त्यांचे दुःख आणि अडचणींचे निवेदन देण्यासाठी ना. अनिलदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या परिस्थितीत, त्यांच्या पत्नी सौ जयश्रीताई पाटील उपस्थित होत्या.. यावेळी शिक्षक संजय पाटील, दिनेश पाटील, आणि हर्षल पाटील सरांनी कर्मचाऱ्यांच्या जाणिवांचा प्रभावीपणे संवाद साधला.

पेंशन पीडीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, त्यांना उपासमारीचा गंभीर मुद्दा अनुभवाला येत आहे. एखाद्या संस्थेत ह्या कर्मचाऱ्यांचे योगदान विचारात घेतल्यास, त्यांच्या पेंशनच्या मुद्द्यावर शुद्ध आणि यथार्थ विचार अधोरेखित करणे आवश्यक आहे. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे ,उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिली..पण आजतागायत निराशाच केली.. याची चर्चा देखील यावेळी झाली. आश्वासनांचे काहीही पालन न केल्यामुळे, या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे ठरवले आहे.

समितीचा अहवाल आल्यानंतरही शासनाने निर्णय घेतला नाही, ही एक कठोर शोकांतिका आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत, पेंशन पीडित कर्मचाऱ्यांनी शासनाला जोरदार उत्तर देण्याचे ठरवले आहे. ताईंनी कर्मचाऱ्यांना विश्वास दिला की, आपल्या भावना व विचार मंत्री अनिलदादा पाटील यांच्याजवळ पोहोचवण्यात येतील असे सांगितले .
अमळनेर तालुक्यातील पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचे संघर्ष अद्याप संपलेले नाहीत. त्यांच्या हक्कांसाठी लढा देणे आवश्यक आहे, आणि या प्रयत्नांमध्ये एकजूट दाखवणे अनिवार्य आहे. सर्व पेन्शन पीडित बांधवांनी एकसंघ राहून लढा देणे गरजेचे आहे.. अमळनेर तालुक्यातील पेंशनपिडीत कर्मचारी शंभरावर आहेत पण आज फक्त 50 मोजकीच संख्या होती…
नामदार पाटील यांच्या वतीने पेन्शन संघटनेचे निवेदन त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना देण्यात आले..

निवेदन देते वेळी यांची होती उपस्थिती…
पेंशन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभूदास पाटील,मुख्याध्यापक प्रकाश पाटील, ईश्वर महाजन,संजय पाटील, दिनेश पाटील, सुरेश महाजन, सतीश बिराडे,दिलीप पाटील, काझी असलमोद्दीन, आरिफ शेख, महंमद बशीर,कल्पना पाटील,विलास पाटील,दिपक वाघ,दगडू सोनवणे, युवराज पाटील,मेघराज पाटील,दिपक पवार, कैलास पाटील,विजय पाटील,मयूर पाटील,मुकेश पाटील, सी.एस.पवार, शशिकांत पाटील,दगडू सोनवणे, युवराज पाटील, मिलिंद पाटील, रतिभान निकम, भरत पाटील, दिलीप पाटील, किशोर पाटील, शशिकांत पवार, अनिल पाटील, शांतीलाल पाटील, श्रीमती नंदा पाटील, राजेंद्र पाटील शिवाजी पाटील, चंद्रकांत पवार, बंडू पाटील, मुकेश पाटील ,जगदीश पाटील ,अनिल पाटील, रंगराव पाटील, जितेंद्र पवार ,श्रीमती सुषमा सोनवणे ,शितल चव्हाण ,प्रवीण पाटील हर्षल पाटील, शिवाजी पाटील ,शरद पाटील, हनुमंतराव पाटील, संदीप गोसावी, दिलीप पाटील सह अनेक पेंशनपिडीत शिक्षक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *