शालेय जीवनातला आनंद शिक्षकांच्या अध्यापनातून मिळवा, जगण्याला दिशा मिळेल-प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो मॅडम
![]()
शालेय जीवनातला आनंद शिक्षकांच्या अध्यापनातून मिळवा, जगण्याला दिशा मिळेल.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो मॅडम
शालेय जीवन हे आपल्या जीवनाच्या जडणघडणीसाठी दिशादर्शक असे असते या जीवनात आनंद मिळवून घ्यायचाच असेल तर शिक्षकांच्या अध्यापनातून तो घेतला गेल्यास भविष्यकालीन जीवनातले अनेक अडथळे सहज पार करता येतात. यश प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करून बराच वेळ गुंतवणुकीची आवश्यकता असते. ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, महत्त्व आणि निकड यावर आधारित कामांना प्राधान्य देवून, ज्यामुळे चांगले व्यवस्थापन होते यात वेळ वाया घालवणारे क्रियाकलाप ओळखणे आणि दूर करणे आवश्यक असल्याचे मत प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी वेवोतोलू केझो मॅडम यांनी आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना माझी स्पर्धा परीक्षेची वाटचाल या विषयावर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १०वी क ची विद्यार्थिनी शुभांगी कोळी होती.
तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आनंद सिंग पाटील – सह आयुक्त कोकण भवन नवी मुंबई यांनी आपल्या मनोगतात आत्मविश्वास व इच्छा असेल तर यश प्राप्तीसाठी परिस्थिती आड येत नाही असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. निकिता सोनवणे हिने केले. ईशस्तवन व स्वागत गीत कु दीक्षा सदावर्ते, कु.कल्याणी सोनवणे व इतर विद्यार्थिनींनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. एल.जे. भुगवड्या सर व श्री. एल. जे.पाटील सर यांनी करून दिला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाला प्रमुख अतिथी असणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व घडवावे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी मिस्तरी
हिने केले व आभार कु.निशा पाटील हीने मानले. विचार मंचावर पर्यवेक्षक श्री एल.जे.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एस.डी. कचरे व भावना चौधरी उपस्थित होते.

