देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्ताने अभिवादन
1 min read

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हास्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते..
मुख्याध्यापक महाजन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर शाळेचे जेष्ठ शिक्षक तथा क्रीडाशिक्षक अरविंद सोनटक्के यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले..

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
देशाला दिशा देण्याचे काम या महामानवांनी केले असे कार्यक्रमांमध्ये विचार व्यक्त करण्यात आले..
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्काऊट शिक्षक एच ओ माळी यांनी केले.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट शिक्षक एस के महाजन, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *