अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र –संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन,अमळनेरला साने गुरुजी पुतळ्यासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘एक दिवस अवधे काही तास गांधी स्मरणात धरू उपवास’कार्यक्रम संपन्न
![]()
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र –संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन..
अमळनेरला साने गुरुजी पुतळ्यासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत
‘एक दिवस अवधे काही तास गांधी स्मरणात धरू उपवास’कार्यक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे.’एक दिवस अवधे काही तास गांधी स्मरणात धरू उपवास’ हा कार्यक्रम अमळनेरला सानेगुरुजी पुतळयासमोर दिवसभर उपास धरून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने सध्याच्या देशातल्या त्या गोष्टी लैंगिक अत्याचार याविषयी मनात खंत व्यक्त साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी केली..
ते पुढे म्हणाले की
गांधीजींनी रामराज्याची कल्पना केली होती. त्यांनी संयम, सदाचार, सहिष्णुता, सहकार्य आणि नैतिकता सांगितली होती. महिलांना समाजामध्ये पुरुषाबरोबरचा हक्क मिळाला पाहिजे. महिलांचा सन्मान करण्याची शिकवण त्यांनी दिली होती. स्वदेशींचा मंत्र त्यांनी देशवासींना दिला होता. परंतु, सध्या देशाची परिस्थिती बघितली तर देशात या विपरीतच सारं काही घडत आहे. आजचे राजकारण आणि सामाजिक व्यवहार गांधीजीच्या सिद्धांतांच्या अनुरुप होताना दिसत नाही. ही खंत त्यांनी व्यक्त केली..

यावेळी धनगर समाजाचे जेष्ठ नेते व सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागवत गुरुजी, काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा
सुलोचनाताई वाघ, केंद्रप्रमुख गोकुळ पाटील,अली मुजावर, प्रा.अशोक पवार सह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की
अहिंसेच्या तत्त्वज्ञानातून आचार, विचार, आणि प्रत्यक्ष कृतीमधून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे युगपुरुष म्हणजे महात्मा गांधी हे होत. देशाची प्रगती साधायची असेल तर त्या प्रगतीचा आत्मा म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी आपले शिक्षण विषयक उच्च विचार मांडले. अहिंसेचे पुजारी हातात शस्त्र न घेता निक्षत्रपणे लढून स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र सैनिक, समाज सुधारक, तत्त्वचिंतक, राष्ट्रपिता व शिक्षणतज्ञ अशा विविध जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी आपल्या विचारातून व प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचे माध्यम, शिक्षणाची उद्दिष्टे, प्रौढशिक्षण विषयक मत, शिक्षक व विद्यार्थी यांचे कर्तव्य, स्त्री शिक्षण, स्वावलंबन, शारीरिक शिक्षण, नैतिकता, प्रामाणिकपणा, धर्मनिरपेक्ष शिक्षण, लैंगिक शिक्षण, आणि नई तालीम अथवा वर्धा शिक्षण याविषयी आपले विचार मांडले.


काही मान्यवरांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले असे सांगितले.
अमळनेरला साने गुरुजी पुतळ्यासमोर सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव, संदीप घोरपडे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी के सूर्यवंशी ,शहराध्यक्ष मनोज पाटील,तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, शाम पाटील ,मा.नगरसेवक राजू दादा फाफोरेकर,नरेंद्र पाटील,काग्रेसचे जिल्हाध्यक्षा
सुलोचनाताई वाघ, सेवानिवृत्त केद्रप्रमुख
भागवत गुरुजी, गजेंद्र साळुंखे, शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते प्रा अशोक पवार,साहित्यिक कृष्णा पाटील,सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, प्रमोद पाटील,पराग पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.डी देशमुख,प्रताप पाटील, डॉ रवींद्र पाटील,हिंम्मत पाटील,प्रा.विश्वास पाटील, प्रा.श्याम पवार,
गित्ताजली घोरपडे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष महेश पाटील, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे सचिव एस.सी.तेले,गुलाबराव बोरसे,केद्रप्रमुख गोकुळ पाटील , पी.वा.पाटील, हरीशचंद्र कढरे,परशुराम महाले,शेख सर,मगन शिंगाणे, हिंमतराव माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे,
आली मुजावर,सैय्यद तेली सह साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक सुनील पाटील दिपक सोनवणे भाऊसाहेब, सह सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व साने गुरुजी कन्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद,उपस्थित होते..
पूज्य साने गुरुजी पुतळ्यासमोर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय पत्रकारिता सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या..





