रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा नूतनीकरणाचे उदघाटन
1 min read

रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा नूतनीकरणाचे उदघाटन

Loading

रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा नूतनीकरणाचे उदघाटन
———————————————–
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत रसायनशास्त्र विभागाची इमारत ही सर्वात जुनी आहे. सन 1945 पासून काही वर्ष महाविद्यालय येथेच भरत होते, रसायनशास्त्र विभागात एकूण सात प्रयोगशाळा आहेत, सर्वच प्रयोगशाळा सुसज्ज आहेत. त्यात सर्वात मोठ्या प्रयोगशाळेचे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा)अनुदानातून नूतनीकरण करण्यात आले.
प्रस्तुत प्रयोग शाळेचे उदघाटन दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी प्रा.डॉ. अजितसिंह राणा (संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद) यांच्या शुभहस्ते झाले. सदर प्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष सीए श्री निरज अग्रवाल, खा.शी.मंडळाचे जेष्ठ सदस्य श्री योगेश मुंदडे, श्री प्रदीप अग्रवाल, प्राचार्य व चिटणीस डॉ.अरुण जैन, प्रा.डॉ. विश्वकर्मा (कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, विभाग प्रमुख प्रा.डॉ. निलेश पवार, आय क्यू एस सी समन्वयक प्रा डॉ मुकेश भोळे, डॉ. मिलिंद ठाकरे, प्रा.डॉ.तुषार रजाळे,
डॉ.रवी बाळस्कर, डॉ.विवेक बडगुजर, डॉ.अमोल मानके, प्रा.रामदास सुरळकर,प्रा.सौ.वैशाली राठोड, सेवा निवृत्त प्रा.डॉ. पी आर शिरोडे, प्रा.डॉ.जयेश गुजराथी, प्रा.हर्षल सराफ, प्रा.प्रीतम बोरसे, प्रा.विवेक पाटील,
प्रा.सौ.मनीषा मोरे, प्रा.मितेश भंडारी,
प्रा.प्रियंका देसले,प्रा.प्रियंका पाटील,
आणि विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *