उत्तम कुंभार यांचे दुःखद निधन उद्या अंत्ययात्रा
![]()
उत्तम कुंभार यांचे दुःखद निधन उद्या अंत्ययात्रा
अमळनेर – तालुक्यातील टाकरखेडा येथील उत्तम राजाराम कुंभार वय – 71 यांचे दि.1 रोजी सायंकाळी धुळे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि.2 रोजी सकाळी 11 वा. टाकरखेडा येथून निघणार आहे.
5 दिवसांपूर्वी टाकरखेडा येथे झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यानंतर धुळे येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, 3 मुली, सूना नातवंडे असा मोठा परिवार असून ते गोपाल कुंभार यांचे वडील होते.

