प्रताप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा संपन्न
———————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेजच्या अंतर्गत रसायन शास्त्र विभागाचे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी टी. वाय. बी. एस्सी. व एम. एस्सी. भाग 1 या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा जळगाव येथील जैन फॉर्म फ्रेश फूड व गांधी रिसर्च फाउंडेशन,शिरसोली रोड, जळगाव येथे संपन्न झाला.
प्रस्तुत शैक्षणिक सहलीमध्ये एकूण 93 विद्यार्थी 11 शिक्षक व एक लॅब अटेंडंट यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी फ्रुट प्रोसेसिंग चा प्लांट बघितला त्यामध्ये प्रामुख्याने आंबा चिकू पेरू या फळांचा ज्यूस एक्सट्रॅक्ट करण्याची प्रक्रिया मुलांनी बघितली. हा प्लांट जगातील तिसऱ्या क्रमांकात गणला जातो तसेच या प्लांट मधून निघणाऱ्या वेस्ट मटेरियल पासून बायोगॅस तयार करणे व बायोगॅस पासून वीज निर्मिती करणे हा प्लांट देखील विद्यार्थ्यांनी पाहिले. त्याचबरोबर जैन टिशू कल्चर या प्लांट मध्ये प्रामुख्याने केळी आंबा डाळिंब मोसंबी चिकू स्ट्रॉबेरी यासारख्या फळांचे टिशू कल्चर करून त्यापासून लाखाहून अधिक उत्तम प्रतीच्या रोपांची निर्मिती टिशू कल्चर लॅब मध्ये होत असते.
प्रस्तुत शैक्षणिक सहलीमध्ये प्रा.रामदास सुरळकर, प्रा.विवेक बडगुजर,
प्रा.अमोल मानके, प्रा.संतोष दिपके,
प्रा.हर्षल सराफ, प्रा.प्रीतम बोरसे,
प्रा.विवेक पाटील, प्रा.वैशाली राठोड,प्रा प्रियंका पाटील, प्रा प्रियंका देसले व लॅब अटेंडंट श्री कुंदन निकम यांचे अनमोल सहकार्य लाभले.

