जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर चा एक सामाजिक उपक्रम
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर चा एक सामाजिक उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
काल “इंदिरा गांधी भवन “अमळनेर येथे पार पडलेल्या ,”चेतना मेलडी
आर्केस्ट्रा” या सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये जो की अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व दोंडाईचा शहरवासीयांच्या सहकार्याने पार पडला.
या कार्यक्रमात एक सामाजिक उपक्रम म्हणून आयोजक श्री तात्याराव पानपाटील यांनी अंधांसाठी आपण काही करू इच्छित असाल तर आपण आर्थिक सहाय्य करा असे सूचित केले. त्यांच्या मागणीनुसार त्याना 5000 रु किंमतीचे किराणा किट कार्यक्रम दरम्यान देण्यात आले ,, या प्रसंगी जायन्ट्स अध्यक्ष सुनील पाटील , उपाध्यक्ष रमेश महाजन, सदस्य रविंद्र पाटील , दीपक पाटील , राजेंद्र पाटील यांनी आयोजनकर्ते यांनी सूचित केलेले काही कलाकार व अंध गरजू व्यक्तीना हे देण्यात आले. आयोजक तात्या पानपाटील व सर्व कलाकार तर्फे कमलाकर प्रजापती या अंध कलाकाराने जायन्ट्स अध्यक्ष सुनील पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन ,सत्कार करून आभार मानलेत ..


