सकल नाभिक समाजाचे ३० सप्टेंबर रोजी मुंबईत महाधरणे आंदोलन  -संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा.
1 min read

सकल नाभिक समाजाचे ३० सप्टेंबर रोजी मुंबईत महाधरणे आंदोलन -संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा.

Loading

 

सकल नाभिक समाजाचे ३० सप्टेंबर रोजी मुंबईत महाधरणे आंदोलन

-संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा.

मुंबई / प्रतिनिधी –
नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज दि.30 सप्टेंबर रोजी सोमवारी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेणार असल्याची माहिती किरण भांगे यांनी दिली.
आज मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला सकल नाभिक समाजाचे किरण भांगे यांच्यासमवेत अखिल भारतीय जिवा सेनेचे कार्याध्यक्ष अनिल बोरनारे, प्रसिद्धी प्रमुख मनोज कोरडे, राष्ट्रीय नाभिक समाजाचे अध्यक्ष अरुण जाधव राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे, महिला प्रदेशाध्यक्ष भारती सोनवणे, सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे कार्याध्यक्ष निलेश रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते
शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढावी व संचालक मंडळातील अध्यक्ष,उपाध्यक्ष,शासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात,थेट कर्ज योजनेतील सिबिल व जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड,कार्यालय,माहितीपत्रक यांचेवर सेना महाराजांचा फोटो वापरावा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.
13 सप्टेंबर 19 रोजी स्थापन केलेले केशकला बोर्ड अग्रेषित करून दि.05 जाने 2024 रोजी ओबीसी महामंडळाची उपकंपनी कऱण्यात आलेली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद केलेले आहे,परंतु कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही.
त्यामुळे शासनाने 5 वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची भावना नाभिक समाजाची झाले आहे.म्हणून महाराष्ट्रातील विविध संघटना एकत्र आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *