विद्यार्थ्यांनो परीक्षेला धैर्याने सामोरे जा.- प्रा.डॉ.नूतन पाटील.
![]()
विद्यार्थ्यांनो परीक्षेला धैर्याने सामोरे जा.- प्रा.डॉ.नूतन पाटील.
जळगाव-येथील के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील वादविवाद मंडळाद्वारे “अभ्यासातील ताण तणाव व व्यवस्थापन ” या विषयावर इ.११वी,१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कसा करावा? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा उपप्रचार्य श्रीमती करूणा सपकाळे यांच्या हस्ते मार्गदर्शक प्रा.डॉ.नूतन पाटील (मानसशास्त्र विभाग नूतन मराठा कॉलेज जळगाव) यांचा यथोचित सन्मान करण्यात.डॉ.नूतन पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा?, अभ्यास करताना येणारा ताण आणि त्या ताणाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी असेही प्रतिपादन केले की, आनंददायी पद्धतीने अभ्यास केला तर तणाव बराचसा कमी होऊ शकतो. अभ्यासाचे पद्धतशीर नियोजन करा, परीक्षेची कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका, चिंतन, मनन, लेखन करा. तसेच तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, ताण आल्यास विद्यार्थी एक तर ताणापासून दूर जातो किंवा ताणापुढे शरणागती पत्करतो. ताण हा दुसऱ्यांसोबत शेअर करायला शिका. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा समन्वय होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाही न्यूनगंड बाळगू नये. त्याबरोबरच नियंत्रण कक्षेच्या बाहेर असलेल्या गोष्टी नियंत्रणात करण्यासाठी प्रयत्न करा. आपली बलस्थाने ओळखा. त्यांच्या जोरावर आपल्या कमतरतांवर मात करा. चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवण्याची संधी जोपासा. तसेच अभ्यासात एकाग्रता आणण्यासाठी विषय व्यवस्थित समजून-उमजून घ्या आणि चर्चात्मक अभ्यास पद्धतीचा अवलंब करा. परीक्षेला अत्यंत धैर्याने सामोरे जा. ताण विरहित परीक्षा द्या. परीक्षेपूर्वी शांत रहा आणि दीर्घ श्वसन करा. असा मौलिक संदेशही त्यांनी आपल्या व्याख्यानात दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे मॅडम यांनी ही अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना तणाव विरहित अभ्यास करण्याचे आवाहन केले.
यावेळी पर्यवेक्षक प्रा.आर. बी. ठाकरे, समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वाद-विवाद मंडळ प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.छाया चौधरी, प्रा.पल्लवी फिरके, प्रा.वर्षा पाटील, प्रा.ईशा वडोदकर, प्रा.अर्चना जाधव, प्रा.हेमंत पिंपळे, प्रा.पूजा सायखेडे, प्रा.उमेश ठाकरे आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री.चेतन वाणी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

