व्हॉइस मीडिया ही संघटना नसून एक परिवार डॉ डिगंबर महाले, व्हॉइस मीडियाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांच्या निवडीबद्दल झाला सत्कार..
![]()
व्हाइस मिडीया पत्रकार संघ नव्हे तो परीवार
डॉ डिगंबर महाले
व्हॉइस मीडियाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांच्या निवडीबद्दल झाला सन्मान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्या द्वारे नुकतीच पार पडली.
व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भारतामधल्या संपूर्ण राज्याच्या निवडणुका होणार असे जाहीर केले होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ऍड.संजीवकुमार कलकुरी आणि सीए सुरेश शेळके या दोघांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
अमळनेर येथील मंगळग्रह संस्थांनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले हे अगोदर व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष होते.. पत्रकार संघटन व व्हाईस मिडीयाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय होते..
त्यांना झालेल्या ह्या निवडणुकीमध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी भरभरून मतदान करून प्रदेश सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली त्या निवडीचा आनंद अमळनेर येथील व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना झाला..
त्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला..
सत्काराला उत्तर देतांना डॉक्टर महाले म्हणाले की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला काम करण्याची परमेश्वर शक्ती देतो.. व्हाईस मिडीया ही संघटना नसून एक परिवार आहे..
निश्चितच भविष्यात व्हाईस मीडियाच्या संघटन व विविध कार्यक्रमांवर भर देऊन संघटनेचा नावलौकिक होईल असे काम उभे करेल असे सांगितले ..


त्यांच्या निवडीबद्दल साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी,व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, दयानंद पाटील,
मिलिंद पाटील, भाऊसाहेब देशमुख, सेवानिवृत्त प्राध्यापक धर्माधिकारी सर, यांनी डॉ महाले त्यांच्या कार्याला उजाळा देत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या..
यावेळी साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, व्हाईस मिडीयाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, उपाध्यक्ष गौतम बिराडे, सचिव जितेंद्र पाटील, सहसचीव ईश्वर महाजन,
कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, जेष्ठ सल्लागार विवेक पाटील, उमेश धनराडे,
सदस्य जयंत वानखेडे, बापूराव ठाकरे, राहुल पाटील, रवींद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, किरण चव्हाण, निरंजन पेंढारे, शरद कुलकर्णी, प्रकाश जैन, बी. एल. पाटील, , दयाराम पाटील, भरत पाटील, सह इतर पदाधिकारी व मंगळ ग्रह संस्थांनचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, व्हि. व्हि. कुलकर्णी उपस्थित होते..
यावेळी सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बापूराव ठाकरे व व्हाईस मीडियामध्ये निरंजन पेंढारे,दयाराम पाटील, किरण चव्हाण,साहित्यिक भाऊसाहेब देशमुख यांचे स्वागत व सत्कार प्रदेश सरचिटणीस डिगंबर महाले यांनी केला..


