मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथील धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा निर्धार
![]()
मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथील धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा निर्धार
अमळनेर प्रतिनिधी
राज्यातील आपल्या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली आज आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. सदर आंदोलनात पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने भागिदारी करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
परंतु महिला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची शासनाने आज दखल घेतली नाही म्हणून धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
सदर आंदोलनाला विधान परिषदेचे सदस्य आमदार मा. आमश्या दादा पाडवी यांनी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा देत मा.मुख्यमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल असे जाहीर केले.

विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मागण्या मंजूर होण्यासाठी संघटना शासन दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे.म्हणुन आज पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
तरी सर्वांनी आळीपाळीने धरणे आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी करावे तसेच अंगणवाडी केंद्रांचे कामकाज नियमित सुरू ठेवावे असे आवाहन श्रीमती.मायाताई परमेश्वर,रामकृष्ण बी.पाटील तसेच युवराज बैसाणे यांनी केले आहे.

