२६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
1 min read

२६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन

Loading

दि.२६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीसह,दरमहा पेन्शन, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी मिळावी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचारी यांना सामाविष्ट करावे. लाडकी बहिण योजनेच्या कामाचा मोबदला मिळावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे मोर्चे,धरणे,बहिष्कार असहकार,संप अशा प्रकारची आंदोलने करीत आहेत.
परंतु त्याची दखल शासन घेत नाहीये उलट अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस कामाचा अतिरीक्त बोझा टाकला जात आहे.याबाबत अनेकदा महीला व बालविकास मंत्री श्रीमती आदितीताई तटकरे,विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एबाविसेयोचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह वरीष्ठ पातळींवर अनेक बैठका होवून चर्चा झाल्या आहेत.परंतु शासनाने आजतागायत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सेवानिवृत्ती नंतर पेन्शन,मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी यासह मानधनवाढीचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करावा आणि लाडकी बहिण योजनेच्या कामाचा मोबदला देण्यात यावा.
यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला असून कोणत्याही परिस्थतीमध्ये माघार न घेण्याचा निर्धार केला आहे.
म्हणून राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका दि.२६ सप्टेंबर रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे मायाताई परमेश्वर,रामकृष्ण बी.पाटील आणि युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
तरी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी सदर आंदोलनात मोठ्या संख्येने भागिदारी करण्यासाठी दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आपल्या सोयीच्या रेल्वेने मुंबईसाठी निघावे आणि धरणे आंदोलन यशस्वी करावे.
असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह श्रीमती मिनाक्षी चौधरी,मंगला नेवे,चेतना गवळी,सविता महाजन, संगीता निंभोरे,शोभा जावरे,रेखा नेरकर,शकुंतला चौधरी,कल्पना जोशी,पुष्पा परदेशी,निता सुरवाडे, सुनंदा नेरकर,रंजना मोरे,साधना पाटील,सरला पाटील,आशा जाधव,सुलोचना पाटील,शुभांगी बोरसे,उज्वला पाटील,नंदा देवरे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *