मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा वेळेवर द्या…,  गरोदर महिलाचे  झाले हाल…
1 min read

मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा वेळेवर द्या…, गरोदर महिलाचे  झाले हाल…

Loading

मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा वेळेवर द्या…

गरोदर महिलाचे  झाले हाल…

अमळनेर प्रतिनिधी
दि 15/09/2024 रोजी मांडळ ता अमळनेर येथे लोकसंख्या अधिक असून आजूबाजूची गावे सुद्धा मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्र यावर अवलंबून आहेत कारण या आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सर्व साधन सामुग्री उपलब्ध आहे परंतु येथे गरोदर महिला प्रसूतीसाठी गेली असता तेथील आरोग्य यंत्रणा ही वाऱ्यावर होती.. तेथे कोणताही अधिकारी कर्मचारी हजर नव्हते.. त्यामुळे त्या गरोदर महिला यांना कोणतीही आरोग्य सुविधे पासून वंचित राहिले मांडळ तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे झालेला प्रकार दिसून आला आहे श्री कमलेश पवार राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या मार्फत जिल्हा कार्यक्रम समन्वयक मुंबई यांच्या पत्नी श्रीमती काजल पवार गरोदर असून त्यांच्या पोटात दुखल्यावर या मांडळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोणताही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते त्या मुळे त्यांचे जीवाचे हाल झाले असे अनेक गरोदर महिलांचे या पूर्वी सुद्धा हाल करण्यात आले आहेत ..सर्व सुविधा उपलब्ध असूनही त्या सुविधांचा वापर करण्यात येत नाही.. त्या नंतर येतील, कर्मचारी यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की मी बाहेर गावी आहे.. मी येऊ शकत नाही व कोणतेही डॉक्टर हजर नव्हते गावकऱ्यांकडून वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही.. त्यानंतर गरोदर महिलेला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता सायंकाळी 6 वाजत तेथे संपूर्ण ग्रामीण रुग्णालयात फक्त 2 नर्सिंग कर्मचारी हजर होते व कोणतेही आरोग्य अधिकारी हजर नव्हते.. तेथील कर्मचारी यांनी प्रसूती आरोग्य अधिकारी यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं मला 2 तास लागतो मी येतो परंतु ते 2 तासानंतरही आले नाहीत.. परत कर्मचारी यांनी फोन करून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की मी बाहेर गावी आहे.. त्यांना सकाळ पर्यंत थांबवा परंतु गरोदर मातेची प्रकृती चिंताजनक झाली असे दिसून आले असता धुळे जावे लागेल असे सांगण्यात आले.. जर आरोग्य सुविधा धुळे येथे घेऊनच घ्यायचा असतील तर मग मांडळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व अमळनेर ला ग्रामीण रुग्णालय कशासाठी आहे? असा सवाल गरोदर मातांच्या पाल्यांनी केला आहे आज अनेक गरोदर माता या आरोग्य कर्मचारी यांच्या पत्नी असून यांना सुविधा मिळू शकत नाही तर इतर सामान्य लोकांना कश्या मिळतील असा प्रश्र्न गावकऱ्यांनी विचारला आहे आरोग्य सुविधांचा अभावामुळे अनेक माता व बालकांच्या मृत्यू होतो यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे जर आरोग्य सुविधा या अधिकारी व कर्मचारी बेजबदर पणे वागत असेल तर कोणीही शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *