श्रीमती द्रो. रा. कन्या शाळा अमळनेर येथे हिंदी दिनाचे औचित्य साधत हिंदी अध्यापक मंडळाकडून घेतली जाणारी जनरल नॉलेजची परीक्षा संपन्न
1 min read

श्रीमती द्रो. रा. कन्या शाळा अमळनेर येथे हिंदी दिनाचे औचित्य साधत हिंदी अध्यापक मंडळाकडून घेतली जाणारी जनरल नॉलेजची परीक्षा संपन्न

Loading

श्रीमती द्रो. रा. कन्या शाळा अमळनेर येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी अध्यापक मंडळाकडून घेतली जाणारी जनरल नॉलेजची परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेत एकूण 465 विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यात इयत्ता 5 वी ते 7 वी या लहान गटातून 260 विद्यार्थिनी तर इयत्ता 8 वी ते 10 वी मोठ्या गटातून 205 विद्यार्थिनी बसल्या होत्या .

लहान गटाच्या परीक्षेचे आयोजन सकाळ हिंदी विभाग प्रमुख शिक्षिका श्रीमती योगेश्री पाटील यांनी केले होते, तसेच त्यांना श्रीमती तीलोत्तमा चव्हाण ,श्रीमती जागृती पाटील, श्रीमती प्रतिभा कोतकर यांनी सहकार्य केले. तसेच मोठ्या गटात दुपार विभागाच्या हिंदी विभाग प्रमुख श्रीमती प्रतिभा साबे त्यांनी परीक्षेचे आयोजन केले होते .सदर परीक्षा घेण्यास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा सूर्यवंशी मॅडम यांनी परवानगी दिली, तसेच विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून सदिच्छा भेट ही दिली.

सदर परीक्षेस विद्यार्थिनींनी भरघोस प्रतिसाद दिला ,त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शिक्षकांचे व विद्यार्थिनींची ही कौतुकही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *