सा भा. विभागाचे कर्मचारी उद्या जोपासणार रक्तातली सामाजिक बांधिलकी ,रक्तदान करणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन..
![]()
सा भा. विभागाचे कर्मचारी उद्या जोपासणार रक्तातली सामाजिक बांधिलकी
रक्तदान करणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांचे सौजन्याने दिनांक 19 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 वा. भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून शासकीय कामाव्यतिरिक्त सामाजिक बांधीलकी जपणारा उपक्रम या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्यातर्फे घेण्यात आला आहे.कार्यकारी अभियंता श्री. प्रांजल पाटील यांच्या पुढाकारणे व त्यांचे मार्गदर्शन घेऊन सहसदर उपक्रम सा. बां.विभाग अमळनेर येथील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचेद्वारे आयोजित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर चे अधिकारी व कर्मचारी वर्ग रक्तदान करणार असून अमळनेर चे नागरिकांना देखील यात सहभागी होणे करीता आव्हान करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील युवकांना रक्तदान करायचे असेल तर संपर्क सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रतिक पाटील 9405053468 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे..

