उदया अमळनेरला सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन..
1 min read

उदया अमळनेरला सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन..

Loading

उदया अमळनेरला सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे बर्‍याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. रक्तदानाचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
हृदयाचे आरोग्य सुधारते –
रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय , हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते त्यामुळे अमळनेर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते ज्यांना रक्तदान करायचे असेल त्यांनी
19 तारखेला सकाळी 11 वा.सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीर आहे. त्यामध्ये आपण रक्तदान करू शकतात अधिक माहितीसाठी
9405053468-प्रतिक पाटील (सा. अभियंता, सा बां विभाग अमळनेर ) यांच्यांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *