किसान काँग्रेसच्या सतर्कतेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे
1 min read

किसान काँग्रेसच्या सतर्कतेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे

Loading

किसान काँग्रेसच्या सतर्कतेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे

अमळनेर प्रतिनिधी- तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांचा प्रश्न असो तो सुटावा व न्याय मिळवण्यासाठी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील नेहमी प्रयत्नशिल असतात.. तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांचे कपाशीच्या उत्पन्नाचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.. त्यामुळे प्रा.पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..

कलाली, दोधवद, हिंगोणे , निंभोरा गावातील शेतकऱ्यांनी टाटा ईशा कंपनीचे कापुस वान लावले आहे पीक चार महिन्यांचे झाले तरी त्या शेतात एकही कैरी नाही,फुल पाती नाही, फुगळी नाही शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधीला वेळोवेळी कल्पना दिली दुसऱ्या वान कपाशीला थोड्याफार कैऱ्या आहेत कंपनीने सांगितल्या प्रमाणे फवारणी केली, खत लावली,शेंडा खोडंल तरी काहीही फायदा नाही ..
कृषी सहाय्यक,पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी ,कंपनी प्रतिनिधी,गावकरी आम्ही किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील व कार्याध्यक्षसह आज स्पॉट पंचनामे केले..
सर्व शेतकरी बांधवांनी किसान काँग्रेसचे धन्यवाद व्यक्त केले..

शेतकरी महेंद्र ठाकरे,राकेश पाटील हिंगोन खुर्द गावाचे, पप्पु पाटील दोधवद , कलाली येथील प्रमोद पाटील,राहुल पाटील प्रवीण भागवत पाटील,नरेंद्र बाबुराव,सुभाष डुबा,पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी ठाकूर साहेब,कृषी अविनाश खैरनार,योगिता लांडगे,योगेश वंजारी,बियाणे कंपनी अधिकारी कृष्णा सुकासे उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *