चलो शिर्डी..चलो शिर्डी..चलो शिर्डी.. पेन्शन महाअधिवेशन..
![]()
चलो शिर्डी..चलो शिर्डी..चलो शिर्डी..
पेन्शन महाअधिवेशन..
आजपासून 10 वर्ष पूर्वी जुनी पेन्शन पुन्हा मिळवणं ही गोष्ट अगदी अशक्य व हास्यास्पद वाटायची पण ती आज जवळपास 80% मिळवली आहे. फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युइटी सह अगदी जवळपास रिटायरमेंटच्या शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन व DA ची चर्चा नव्या UPS या योजनेत मध्ये होतेय पण तरीही अजून अनेक त्रुट्या या योजनेत आहेतच म्हणूनच जशीच्या तशी 1982/84 ची जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी आरपारची आपली लढाई सुरु आहे.

मागील 10 वर्षात सर्वांच्या साथीने, एकजुटीने व एकत्रित एकसंघ लढा दिल्याने पेन्शची ही लढाई आपण 80% जिंकू शकलो आहोत. उर्वरित 20% लढाही यशस्वी होईल त्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येणे गरजेचे आहे. सरकारने DCPS, NPS, GPS ते आता UPS अशी 10 वर्षात चार वेळा पेन्शन योजनेत बदल केला आहे. आता पुढील बदल हा सरसकट जुनी पेन्शन योजना हाच राहील त्यासाठी आपली ताकद दाखवणे आवश्यक आहे.आपली पेन्शन साठीची ही चळवळ सातत्याने वळवळ करत राहीली म्हणूनच आपण आतापर्यंत 0 ते 80% यश मिळवू शकलो आहोत. म्हणून सर्वानी दि. 15 सप्टेंबर रविवार रोजी शिर्डी येथे महाअधिवेशनाला आवर्जून उपस्थित रहावे हे जाहीर आवाहन तथा नम्र विनंती.
*========================
आपलीच
श्रीम.सुवर्णा धनगर
*जिल्हा उपाध्यक्ष महिला-* महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जळगाव.
*========================*

