सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न
![]()
सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न
श्री. चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व पी इ तात्या पाटील आय रुग्णालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची दिनांक 31-7-2024ते 3-9-2024या दरम्यान करण्यात आली.यामध्ये 825 विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी सचिव मा.श्री. राहुल पाटील, प्रा.डॉ. समीर साकळीकर यांच्या सहकार्याने ,नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे व इतर सहकारी यांनी केली.विद्यार्थी ने आण करण्यासाठी पी. ई. तात्या पाटील आय हॉस्पिटल यांच्यामार्फत वाहन उपलब्ध करून देण्यात आले.वाहनचालक श्री सोनार दादा यांचे सहकार्य लाभले. यासाठी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक डॉ.एम व्ही बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच पर्यवेक्षक श्री एल जे पाटील व सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.आरोग्य समिती प्रमुख सौ. एच. ए. सोळंके यांनी याचे नियोजन केले.

