स्पर्धा परीक्षेत C३ महत्वाचे-  पीएसआय मुस्तफा मिर्झा यांचे प्रतिपादन
1 min read

स्पर्धा परीक्षेत C३ महत्वाचे- पीएसआय मुस्तफा मिर्झा यांचे प्रतिपादन

Loading

स्पर्धा परीक्षेत C३ महत्वाचे-

पीएसआय मुस्तफा मिर्झा यांचे प्रतिपादन
——————————————–
C३: चॉईस,चान्स,चेंज करिअरसाठी उपयुक्त

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील करिअर कौंसेलिंग सेंटर व रुसा यांच्या वतीने *स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी* या विषयावर शिरपूरचे पीएसआय मुस्तफा मिर्झा यांनी ११.०९.२०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता सीसीएमसी हॉल येथे विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,स्पर्धा परीक्षेत परिश्रम,जाणीव, मागच्या प्रश्न पत्रिकेचे वाचन,निवड,संधी,बदल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.दैनंदिन जीवनात सकारात्मकता, नम्रता, सातत्य,मूल्य,योग्य मार्ग व संपादकीय लेख,विशेष कामगिरी हे सर्व करिअर साठी महत्वाचे आहे.
पीएसआय मिर्झा यांनी २०२२ मध्ये कोण होणार मराठी करोडपती या टीव्ही शो मध्ये १२.५० लाख रुपये जिंकले होते,त्यांनी २५ लाखांचा प्रश्न हाताळले होते.यावेळी आफ्रिन पठाण यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न विचारले.
प्रस्तुत मार्गदर्शन व्याख्यान प्रसंगी विचार मंचावर करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,डॉ.आर.सी सरवदे,डॉ.माधव भुसनर,प्रा.जयेश साळवे यांच्यासह ४७ विद्यार्थी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह सचिव डॉ धिरज वैष्णव, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे यांच्यासह सीसीएमसी विभागातील दिलीप शिरसाठ,पराग पाटील,चेतन राजपूत,अतुल धनगर आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *