भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. 
1 min read

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. 

Loading

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा.

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19 वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन संस्थेच्या सचिव संगीता बियाणी होत्या उद्घाटन भुसावळ वाहतूक शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक उमेश महाले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष,डॉ. प्रदीप साखरे . शाळेचे प्राचार्य डी एम पाटील , बी एन पाटील , संजय भदाणे , तांत्रिक समिती सदस्य विलास पाटील, लक्ष्मीकांत नेमाडे, ललीत फेगडे यांच्यासह शाळांचे क्रीडा शिक्षक व खेळाडू विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व स्पर्धेचे उद्घाटक उमेश महाले यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन व श्रीफळ फोडून करण्यत आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना खेळाडूंनी खेळ हा आनंदासाठी खेळावा. खेळामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खेळ खेळा असे मत आपल्या मनोगत व्यक्त केले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
14 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक गंगाधर सांडू विद्यालय वरणगाव द्वितीय विवेकानंद विद्यालय भुसावळ पटकावला. अहिल्यादेवी कन्या विद्यालय तृतीय स्थानी राहिले.
17 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक. पंडित नेहरू विद्यालय वाराडसीम , व द्वितीय क्रमांक डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल. तृतीय स्थानी सर्वोदय स्कूल किन्ही राहीला,
19 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक पु.ओ. नहाटा महाविद्यालय भुसावळ. संघ विजयी झाले. द्वितीय स्थानी महात्मा गांधी विद्यालय वरणगाव तर तृतीय स्थानी बियाणी ज्युनियर कॉलेज राहीला पंच म्हणून बी एन पाटील, नयन सागर मानी, विलास पाटील, मुकेश मोरे, काजल बारोट, नम्रता गुरव, ललित फेगडे , वाणी सर, आदींनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डी एम पाटील ,तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे तांत्रिक समिती सदस्य विलास पाटील, लक्ष्मीकांत नेमाडे. हिम्मत पाटील, यांच्यासह बियाणी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *