संख्याशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त- प्रा.सुकलाल कुंभार यांचे प्रतिपादन
1 min read

संख्याशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त- प्रा.सुकलाल कुंभार यांचे प्रतिपादन

Loading

संख्याशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त- प्रा.सुकलाल कुंभार यांचे प्रतिपादन
———————————————–
अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत संख्याशास्त्र विभागामार्फत आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी, प्रतिभा वाणिज्य व संगणकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक प्रा.सुकलाल कुंभार यांचे Statistics Insights: Career Opportunities in Government Sectors या विषयावर आज व्याख्यान संपन्न झाले. प्रा.कुंभार यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्रातील विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले. सरांनी विद्यार्थ्यांना ISS, RBI, SSC,MPSC व UPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या अनेक सरकारी नोकरी बद्दल सखोल मार्गदर्शन केले.प्रस्तुत कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद होता,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण.बी.जैन होते.अध्यक्षीय मनोगतात सरांनी संख्याशास्त्र विषयाचे प्रत्येक क्षेत्रात असणारे महत्त्व विशद केले.संख्याशास्त्र विषय हा जवळजवळ सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये वापरला जातो असे सरांनी सांगितले,संख्याशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांची वाढता कल दिवसें दिवस वाढत आहे यावरून संख्याशास्त्र विषयाला असणारे महत्त्व सरांनी पटवून दिले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उमेश येवले यांनी केले

 

प्रस्तुत समारंभ प्रसंगी संख्याशास्त्र विभागातील सेवा निवृत्त प्राध्यापक डॉ.पी.बी.भराटे,प्रा.जे.सी.अग्रवाल,प्रा.जे.बी.जैन तसेच इतर सहकारी प्राध्यापक प्रा.उमेश येवले, प्रा.मोहिनी साळी,
प्रा.अश्विनी कोळी, प्रा.प्रियंका उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.भावना खैरनार यांनी केले तर आभार प्रा.विक्रांत निकम यांनी मानले.
सदरच्या समारंभ करिता खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ संदेश गुजराती, कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल,प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव, डॉ.मुकेश भोळे,उपप्राचार्य डॉ.अमित पाटील यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *