स्मिता शिपूरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
![]()
स्मिता शिपूरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार श्रीमती स्मिता शिपूरकर एच के गिडवाणी काॅस्मोपाॅलीन इंग्लिश हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज मुंलूड मुंबई यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांचे अनेक वर्षांपासून चांगल्या पद्धतीने काम करत होते त्यांना १०० अधिक पुरस्कार मिळालेले आहे त्यांचे कार्य
एनसीआरटी पुणे मार्फत नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महाकरिअर संकेतस्थळाबाबत जाणीव जागृती, मार्गदर्शन व समुपदेशन ,विकसिन समिती तज्ञ, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे तर्फे मनोदर्पन हेल्पलाईन द्वारे तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड,राज्य व जिल्हास्तरीय यशदा , सीसीटीव्ही शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती ,लोकचेतना उपक्रमात मार्गदर्शक आशा या स्मिता शिपूरकर मॅडम यांना राज्यशासनाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,दिपक केसरकर साहेब शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुरलीधर बेडगे,सौ.रुपाली पाटील मॅडम, डॉ सिमा माळी मॅडम, मनिषा बेडगे मॅडम, विशाखा रुपल डॉ.बी.जी.गायकवाड ,प्रा.व्यकंट होनाळे यांनी अभिनंदन केले.

