भालेराव नगर व पाटील गढीत शिक्षक दिन उत्साहात साजरा
1 min read

भालेराव नगर व पाटील गढीत शिक्षक दिन उत्साहात साजरा

Loading

भालेराव नगर व पाटील गढीत शिक्षक दिन उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी
पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमच्या भालेराव नगर व पाटीलगढीतील सर्व सदस्यांनी शिक्षक दिन साजरा केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसो संदीप पाटील माजी जी प सदस्य यांनी केले.
रामकृष्ण पाटील ,सौ कल्याणी ताई पाटील उपसरपंच शिरूड या बोलतांना म्हणाले की, एक उत्कृष्ट ध्येय साधण्यासाठी शिक्षकाची साथ मिळणे परमभाग्य असते. शिक्षक मुलांना त्यांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विद्यार्थी घडवत असतात.
ऍड. दिनेश पाटील बोलताना म्हणाले की , शिक्षकांच्या सहवासात राहतो हे मी माझे परम भाग्य समजतो.
शिक्षक प्रतिनिधी दोन जणांचे मनोगत एक पुरुष आणि एक महिला शिक्षिका. श्री हरेश्वर सैंदाणे सर म्हणाले की,आपण आमचा सत्कार केला त्या बद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो.
शिक्षक महिला प्रतिनिधी सौ सुवर्णा दुसाने म्हणाल्याकी,आजच्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन पाहून आम्ही शिक्षक शिक्षिका भरून गेलो.

आबासो.श्री गोकुळ पाटील मा. केंद्रप्रमुख यांनी याप्रसंगी सांगितले “वेळ पाहून खेळ करावा”. कुठं थांबायचं हे ज्याला कळत नाही त्याला भाषण म्हणत नाही. त्याचे भाषण गुणवत्तापूर्ण असावे.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा करतात.
शिक्षक म्हणजे एक समुद्र…ज्ञानाचा एक आदरणीय कोपरा…प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा…शिक्षक निष्पाप बालकांना मातीसारखा आकार देणारा कुंभार…
शिक्षक म्हणजे शि- म्हणजे शिस्त क्ष- म्हणजे क्षमा आणि क- म्हणजे कर्तव्य असा शिक्षक…समाजातील कोणीही चुकला तर फार मोठे नुकसान होत नाही. ते भरून काढता येते. परंतु एक शिक्षक चुकला तर संपूर्ण आयुष्यात अनेक पिढ्या बरबाद होऊ शकत…
शिक्षक जगण्यातून जीवन कला देणारा, आयुष्य दशा आणि दिशा घडवणारा…
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याची अहोरात्र ज्याला काळजी असते तो शिक्षक…श्री देविदास मुकुंद पाटील अध्यक्ष भाषणात बोलताना म्हणाले की,प्रथम आज आपण सर्वांनी सत्कार करून सन्मानित केले त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार आणि यापुढेही कायमस्वरूपी पुन्हा गोविंदाने असाच कार्यक्रम आपल्या कॉलनीत राबविण्यात यावा ही विनंती मी पुढील कार्यक्रमासाठी एक हजार रुपये देणगी देत आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री रामकृष्ण पाटील, संदीप पाटील, दिनेश पाटील वकील साहेब, उज्वल पाटील ,किशोर सुर्वे भाऊसाहेब महाजन, रणधीर पाटील, परमेश्वर पाटील, डॉ.राहुल लांबोळे मेडिकल ऑफिसर, किशोर पाटील, दादासाहेब कुलकर्णी, चेतन साळुंखे, डॉ. गणेश पाटील डॉ. संजय मुसळे, दयाराम पाटील, निलेश पाटील कृषी, दिनेश पाटील कृषी, अमोल कोठावदे कृषी, भानुदास पाटील ऑपरेटर, भूषण शिंपी, रमेश चव्हाण, ललित कांकरिया, शिंदे नाना, हेमंत कोळी, भावेश जैन ,पराग आप्पा ,प्रकाश पाटील यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार श्री रामकृष्ण पाटील यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *