ज्ञानेश्वर कुवर जि प प्राथ. शिक्षण जिल्हा पुरस्काराने सन्मानित…
![]()
ज्ञानेश्वर कुवर जि प प्राथ. शिक्षण जिल्हा पुरस्काराने सन्मानित…
जळगाव ला ना हायस्कूल येथील गंधे सभागृहात दिनांक 5 सप्टेंबर रोजी आयोजित जि प प्राथमीक शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
जळोद जि प उच्च प्राथमिक शाळा येथील पदवीधर शिक्षक श्री ज्ञानेश्वर कुवर यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024 मा. नामदार श्री गिरीश भाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री) यांच्या हस्ते वितरण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार मा.स्मिताताई वाघ,आमदार मा. लताताई सोनवणे,जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मा.अंकित साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम,डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. विकास पाटील आदी उपस्थित होते. ना. श्री.गुलाबराव भाऊ पाटील हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने त्यांनी कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

